अखेर वेताळ बांबर्डे ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ व बेजबाबदार कारभाराविरोधात वेताळ बांबर्डे ग्रामस्थांनी आज उपोषण आंदोलन छेडले.
सकाळी 10 वाजताच्या सुमारास आंदोलनकर्ते उपोषण स्थळी जमा झाले. पाणी पुरवठा. विभागाचे शाखा अभियंता विकास पवार यांनी 10.15 च्या सुमारास उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी बातचीत केली, मात्र कार्यकारी अभियंता जो पर्यंत येत नाहीत तो पर्यंत कुठलीही चर्चा नाही अशी भूमिका प्रसाद गावडेंनी घेतली.

दरम्यान 11.30 च्या सुमारास कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेत शाखा अभियंता पवार यांना आंदोलनावर सकारात्मक चर्चा करण्याची सूचना केली. अखेर दुपारी 2 च्या सुमारास कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सुदेश राणे यांनी आंदोलन स्थळी हजर राहत येत्या आठ दिवसांत काम चालू करतो असे लेखी पत्र दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले.


यावेळी सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे,शैलेश घाटकर, अवधूत सामंत, साजूराम नाईक,अरविंद बांबर्डेकर, दिलीप तिवरेकर,बाबा मुजावर, महादेव परब, नारायण गावडे, योगेश ठाकूर, रमण गावडे, पिंटू दळवी यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!