मालवणात उबाठा सेनेला मोठा धक्का

मालवण : मालवणमध्ये उबाठा सेनेला मोठा धक्का बसला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या अनेक दिग्गजांनी ठाकरेंची साथ सोडली आहे.

यामध्ये ठाकरे सेनेचे जिल्हा प्रवक्ते माजी नगरसेवक मंदार केनी, माजी नगरसेवक यतीन खोत, कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघप्रमुख सौ. शिल्पा खोत, माजी नगरसेविका सौ. दर्शना कासवकर, समाजसेवक भाई कासवकर आदींचा समावेश आहे.

या सर्वांचा कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्यामुळे रविंद्र चव्हाण यांच्याकडून हा वैभव नाईकांना एक धक्का मानला जात आहे.

error: Content is protected !!