देवगड मालवण रोडवर आचरा येथे असलेल्या सचिन राणे यांच्या वडापावच्या टपरीला गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास अकस्मात लागलेल्या आगीत संपूर्ण टपरीसह आतमधील सर्व सामान, फ्रिज, पेटीतील पैसे जळून हजारोंचे नुकसान झाले. खबर मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत आतील गॅस सिलिंडर बाहेर काढून टाकल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आचरा देवगड रस्त्यालगत पोयरे येथील सचिन राणे यांनी वडापाव टपरी उभारून आपला व्यवसाय सुरू केला होता. गुरूवारी पहाटे साडेचारच्या सुमारास आचरा तिठा येथे रसवंती व्यावसायिकाचा उस उतरणारया गाडीवाल्याला लांबून आग लागल्याचे लक्षात येताच त्यांने याची ग्रामस्थांना माहिती देताच छोटू पांगे, माणिक राणे, बाबा वडापाव सेंटरचे बाबा आंबेरकर, यांसह अन्य ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता एवढी होती की संपूर्ण टपरी आतील सामानासह जळून गेली. प्रसंगावधन राखत ग्रामस्थांनी आतील गॅस सिलिंडर बाहेर काढून टाकल्याने दुर्घटना टळली. मात्र यात सचिन राणे यांच्या टपरीतील वडापाव साहित्य, पेटीतील पैसे, फ्रिज, पाण्याच्या बॉटल, पाण्याची भांडी यांसह अन्य साहित्य जळून हजारोंचे नुकसान झाले. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.
याबाबत माहिती मिळताच आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, सचिव पंकज आचरेकर, माजी उपाध्यक्ष जुबेर काझी यांनी भेट देऊन पाहणी केली होती. खबर मिळताच आचरा पोलीसांनीही घटना धाव घेतली होती.













