कै. बुवा संतोष वामन केसरकर स्मृती प्रित्यर्थ निमंत्रित भजन स्पर्धा

संतोष केसरकर मित्रपरिवार आणि कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ पावशी बेलनदी वाडी यांचे आयोजन

कुडाळ : मंगळवार दिनांक ४ मार्च २०२५ रोजी संतोष केसरकर मित्रपरिवार आणि कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ पावशी बेलनदी वाडी यांच्या वतीने कै. बुवा संतोष वामन केसरकर स्मृती प्रित्यर्थ निमंत्रित भजन स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक म्हणून ₹ ५०००/- व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक म्हणून ₹ ३०००/- व आकर्षक चषक तसेच तृतीय पारितोषिक म्हणून ₹ २०००/- व आकर्षक चषक दिले जाणार आहे. तसेच दोन भजन मंडळांना प्रत्येकी ₹१०००/- व आकर्षक चषक दिले जाणार आहे.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे उत्कृष्ट गजर, उत्कृष्ट तबला, उत्कृष्ट पखवाज, उत्कृष्ट हार्मोनियम, उत्कृष्ट चकवा, उत्कृष्ट कोरस व उत्कृष्ट गायक अशी भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. तेव्हा या स्पर्धेत मोठ्या संख्येने भजनी मंडळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संपर्क :

स्वामी केसरकर – 9405399293

स्थळ : ब्राम्हण मंदिर, बेलनदीवाडी, पावशी

error: Content is protected !!