राजापूर : सर्व सामान्य जनतेशी निगडीत कोणतीही समस्या असो वा काम.. माजी खासदार आणि मालवण कुडाळचे आमदार निलेश राणेंना कळले आणि ते झाले नाही असे कधीच होत नाही. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील ठेकेदाराची मनमानी, प्रशासनाची दिरंगाई आणि रखडलेले प्रश्न निलेश राणेंकडे मांडले की हमखास सुटणार न्याय मिळणार असा जनतेचा दृढ विश्वास निलेश राणे यांनी त्यांच्या कृतीतुन सार्थ करून दाखविलेला आहे. महामार्ग चौपदरीकरणात झाडे तुटली, जुने प्रवासी मार्ग निवारे (पिकअप शेड) उध्दवस्त झाले. महामार्गाचे काम पुर्णत्वाला जात असताना नवीन मार्ग प्रवासी निवारे (पिकअप शेड) उभारण्याबाबत दिरंगाई होऊ लागली. प्रवाशांना एसटी बसची वाट पहाताना उन आणि पावसात उभं रहावे लागले. याबाबत स्थानिकांनी निलेश राणे यांचे याकडे लक्ष वेधले आणि निलेश राणेंचा एक कॉल महामार्ग विभागातील प्रशासकिय अधिकाऱ्यांना गेला आणि राजापूर तालुक्यात महामार्गावर तब्बल नऊ प्रवासी मार्ग निवारे (पिकअप शेड) मंजूर झाले व त्याची बांधकामेही सुरू झाली आहेत. त्यामुळे भविष्यात महामार्गावर एसटी बसची वाट पहाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सन २००९ ते २०१४ या पाच वर्षाच्या खासदारकीच्या कार्यकाळात रत्नागिरी जिल्हयातील जनतेशी जोडले गेलेले नातं आजही तेवढंच पक्क आहे हे त्यांनी केलेल्या प्रत्येक कामातुन दिसून येते. रत्नागिरी जिल्हयातील जनतेशी निगडीत कोणताही प्रश्न असो वा काम ते तात्काळ मार्गी लावणार हा आ. निलेश राणेंचा खाक्या आहेत. त्यांच्या खासदारकीच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात जिल्हयातील विविध रस्त्यांसह केंद्र शासनाशी निगडीत अनेक योजनांची अंमलबजावणी जिल्हयात झाली. वाडीवस्तीवर जाऊन जनतेशी थेट संवाद साधणारा खासदार अशी त्यावेळी त्यांची निर्माण झालेली ओळख आजही जनमानसात कायम आहे. त्यामुळे आपला प्रश्न सोडविणारा हक्काचा माणूस म्हणून जनता आज त्यांच्याकडे पहाते. राजापूर तालुक्यातील विविध रस्ते, पुल यांसारखे प्रश्न आ. निलेश राणे यांच्यामुळे मार्गी लागले व आजही लागत आहेत. राजापूर तालुक्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने झाले मात्र, महामार्गावरील अनेक ठिकाणच्या थांब्यावर प्रवासी मार्ग निवारे उभारण्यात न आल्याने प्रवाशांना एसटीसह वाहनांच्या प्रतिक्षेसाठी उन-पावसाच्या झळा सहन करीत रस्त्यावर उभे रहावे लागत आहे. काही मुख्य थांब्यावर हे प्रवासी मार्ग निवारे उभारण्यात आले पण अनेक छोट्या बस थांब्यांवर ते उभारणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेवून उन्हाळे गंगातीर्थ येथील ग्रामस्थांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत आंदोलनही केले. याची दखल घेत माजी खासदार व मालवण कुडाळ विधानसभेचे आमदार
निलेश राणे यांनी राजापूर तालुक्यात महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी प्रवाशांची मार्गनिवाऱ्याची मागणी आहे त्या ठिकाणी ते उभारावेत अशी शासनाकडे मागणी केली. निलेश राणेंचे पत्र आणि फोन याची दखल शासन व प्रशासनाला घ्यावीच लागली आणि महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणि मागणी प्रमाणे बारा पिकअपशेडचा मंजूर झाल्या. यामध्ये उन्हाळे-गंगातीर्थ, उन्हाळे-आग्रेवाडी, शासकीय विश्रामगृह राजापूर, हातिवले, मारूती मंदीर (हातिवले), कोंड्ये, पन्हळे, टाकेवाडी, काझीवाडी, कोंडीवळे, खरवते सोरप दुकान, गगनगिरी महाराज मठ या मार्ग निवाऱ्यांचा समावेश आहे.भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद लांजेकर यांसह भाजपा पदाधिकारी व स्थानिकांनी यासाठी राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. शिवणेवार, श्री. कुमावत यांनीही महत्वाची भूमिका बजावली आहे.या मंजूर झालेल्या सर्वच मार्ग निवाऱ्यांची कामे सुरू झाली असून काही दिवसातच ती पुर्ण होणार आहेत. एक दोन ठिकाणी जागे अभावी अद्याप काम सुरू झालेले नाही, मात्र महामार्ग विभागाकडून त्यावर मार्ग काढण्यात येणार आहे. या मार्ग निवाऱ्यांच्या पुर्ततेमुळे महामार्गावरून त्या त्या गावातुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आता एसटी बस पकडण्यासाठी उन्हा पावसात होणारी परवड थांबवणार आहे. त्यामुळे आ. राणे यांचे आभार प्रवाशांतुन व्यक्त केले जात आहेत. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रत्येक प्रश्न व अडचणीत आ.निलेश राणे राजापुरकरांसाठी धाऊन आले. मग मोबदला मिळण्यासाठी झालेला विलंब असो, आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधणे असो, कोदवली येथील डुंगीतील देवीच्या मंदिराची उभारणी असो अशी अनेक कामे व जनतेच्या समस्या निलेश राणे यांच्यामुळे मार्गी लागल्या आहेत. त्याही अगदी जागेवर एका फोनवर. हातिवले येथील टोल विरोधी आंदोलनाता सत्तेत असूनही त्यांनी सामान्य जनता व वाहन चालकांसाठी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळेच आज टोलचे संकट टळलेले आहे हे राजापूरकर आजही सांगतात. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हाकेला धाऊन येणारा आपला हक्काचा माणूस अशीच निलेश राणे यांची ओळख आहे हे त्यांनी आपल्या आजवरच्या प्रत्येक कृतीतुन दाखवून दिले आहे.