कर्नाटकला जाणाऱ्या लाल परिची चाके आता अनिश्चित काळासाठी बंद

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

कोल्हापूर: महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुरू असलेला भाषिक वाद आता बसेसवर उफाळून येऊ लागला आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील चालकाला मारहाणीची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद केल्या आहेत. कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य परिवहन बसच्या चालकाला मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर कन्नड रक्षा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बसचालकाच्या तोंडाला काळे फासले. यासोबतच बसलाही काळे फासण्यात आले आहे. याविरोधात ठाकरे यांच्या शिवसेनेने कोल्हापुरात जोरदार आंदोलन केले.त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे. कोल्हापूर आगारातून जाणाऱ्या 50 बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. यामधून सीमाभागात एसटीतून प्रवाशांचा प्रवास होत असतो. मात्र, आता बसेस बंद केल्याने बेलगाव, बंगळूरपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांची अडचण होणार आहे.

https://twitter.com/PratapSarnaik/status/1893503549071598008?t=buPpjd7dILT2-8BLw7p9mg&s=19

एमएसआरटीसी बसवर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी कर्नाटकला जाणाऱ्या राज्य परिवहन बसेसची सेवा बंद करण्याचे आदेश दिले. सरनाईक म्हणाले की, बेंगळुरूहून मुंबईला येत असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ( बसवर शुक्रवारी रात्री कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी हल्ला केला. मंत्र्यांनी सांगितले की, कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी चालक भास्कर जाधव यांच्या तोंडाला काळे फासले आणि त्यांना मारहाण केली. कर्नाटक सरकार या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत बससेवा पूर्ववत होणार नसल्याचे सरनाईक म्हणाले.

error: Content is protected !!