युवा संघर्ष मित्रमंडळ, वालावल शिवजयंती विशेष वेशभूषा स्पर्धा घेण्यात संपन्न

कुडाळ : युवा संघर्ष मित्रमंडळ, वालावल शिवजयंती विशेष वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून सन्मा.श्री.सतीश लळीत सर ,हौशी पुरातत्व अभ्यासक घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष यांचे उपस्थिती लाभली.डॉ. सई लळीत ,ग्रामपंचायत उपसरपंच सौ. आडेकर, सदस्य सौ कवठणकर,सौ,हळदणकर त्याच सोबत लक्ष्मीनारायण देवस्थान चे सदस्य गुरु देसाई व ग्रामस्थ महेंद्र तेली,गोविंद पेडणेकर, संदेश करंबेळकर, कांता घाडी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲड. करुणाकर राऊळ,यांनी स्वीकारले व स्पर्धा प्रमुख सागर पाटकर आणि सर्व सदस्य पूजा राऊळ,भाग्यश्री राऊळ,प्रणिता वालावलकर, वैष्णवी चव्हाण,विजय वालावलकर ,राहुल पालकर ,विशाल राऊळ,हेमंत वालावलकर,अक्षय सारंग,ह्यां सर्वाचे मोलाचे सहकार्य लाभले.


स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये ४५ व मोठा गट १५ अशा एकूण ६० मुलांनी सहभाग घेतला, परीक्षक म्हणून सन्मा. श्री सांगळे सर, शिक्षक,चेंदवण हायस्कूल व कु.रुचिता शिर्के, अभिनेत्री या दोन्ही परीक्षकांनी उत्तम परीक्षण करून,

मोठा गट
प्रथम :- मयुरी चव्हाण
द्वितीय :- केतकी हळदणकर
तृतीय :- जयेश राऊळ
उत्तेजनार्थ प्रथम :- श्रुतिका परब
द्वितीय:- आस्था गाडी

लहान गट
प्रथम :- जीवेश सागर नाईक
द्वितीय:- यश सतीश नेरुरकर
तृतीय:- निधी सुधीर नेरुरकर
उत्तेजनार्थ प्रथम:- तन्वी प्रभू
द्वितीय :- हार्दिकी नागदे


या मुलांची निवड केली,परीक्षक, सर्व मंडळाचे सदस्य यांनी दर्जेदार नियोजन व निकष मिळून स्पर्धा यशस्वी केली.
सर्व स्पर्धक व स्पर्धे मध्ये क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांचे मनपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा , स्पर्धे मध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धकांचे विशेष अभिनंदन व सर्व पालकांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.

error: Content is protected !!