श्री. भराडी देवी, आंगणेवाडी यात्रेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या खबरदारीबाबत…

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात मौजे मसुरे, आंगणेवाडी येथील श्री. भराडी देवीचा वार्षिक जत्रौत्सव दि. 21.02.2025 ते दि. 23.02.2025 रोजी साजरा होणार आहे. नमुद जत्रौत्सवासाठी दरवर्षी सुमारे 03 ते 04 लाख भाविक मुंबई व महाराष्ट्र राज्यातील विवीध काना- कोपऱ्यातुन येत असतात. तसेच महाराष्ट्र राज्यातील मंत्री महोदय देखील श्री. भराडी देवीच्या जत्रौत्सवाला येणार आहेत.


नमुद यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये याकरीता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने पोलीस उपअधीक्षक – 06, पोलीस निरीक्षक – 13, सपोनि / पोऊनि – 32, पोलीस अंमलदार- 500, दंगल नियंत्रण पथक – 02, होमगार्ड – 150 तसेच घातपात विरोधी पथक, छेडछाड विरोधी पथक, क्राईम ब्रँचची साध्या गणवेशातील विवीध पथके तैनात करण्यात आलेले आहे. तसेच यात्रेतील भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 10 व्हिडीओ शुटींग कॅमेरे व ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने संपुर्ण यात्रेची निगराणी करण्यात येणार आहे.

तसेच दिनांक 20.02.2025 व दि. 21.02.2025 रोजी मालवण पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांनी दंगल नियंत्रण पथकासोबत रोडमार्च करुन अनुक्रमे मसुरे, मालवण व कणकवली कडुन रोडवर असलेले अतिक्रमण हटवुन तसेच अनधिकृत पार्किंग करुन ठेवलेली वाहने हटवुन रस्ता जास्तीत-जास्त रहदारीसाठी मोकळा राहील याची खबरदारी घेण्यात आलेली आहे. तसेच दुकानदार, फेरीवाले, हॉकर्स यांनी प्रशासनाने ठरवुन दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे त्यासाठी स्वतंत्र पथक कार्यान्वित करण्यात आलेले आहे.

यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने भाविकांचे सोबतचे नातेवाईक, लहान मुले, वस्तु गर्दीत हरवले जातात काही वेळेस वस्तुंची चोरी होते अशा वेळी भाविकांना तात्काळ सर्वोतोपरी मदत मिळावी म्हणुन पोलीस नियंत्रण कक्ष, आंगणेवाडी व्यतीरीक्त अन्य 03 पोलीस मदत केंद्र 1) कणकवली एसटी स्टॅण्ड 2) मंदिर परिसरातील स्टेजजवळ, 3) मालवण एस टी स्टॅण्ड येथे त्याचप्रमाणे 03 वाहतुक पोलीस मदत केंद्र अनुक्रमे 1) बिळवस तिठा, 2) मालवण एस टी स्टॅण्ड, 3) मसुरे एसटी स्टॅण्ड व 01 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी मंदिराच्या पाठीमागील परिसरात मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.

संपुर्ण यात्रा परिसराची मालवण पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकांनी पाहणी करुन संशयीत वाटणाऱ्या 50 इसमाचे आधार कार्डवरील नाव व पत्याची खात्री करुन घेवुन त्यांना आवश्यकत्या सुचना दिलेल्या आहेत. तसेच यात्रेत आलेल्या परप्रांतीय कामगारांची माहिती घेवुन त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मोटर वाहन कायद्यांतर्गत एकुण 54 वाहतुकच्या केसेस करण्यात आलेल्या असुन त्यांना 29,700/- रुपये दंड वसुल करण्यात आलेला आहे.

वाहतुक पोलीसांमार्फत वाहन चालकांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी सुरु असुन मद्य पिवुन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यात्रास्थळी येणारे सर्व रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा होणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली असुन महत्वाच्या ठिकाणी वाहतुक पोलीस 24 तास कार्यरत करण्यात आलेले आहेत. तसेच पोलीसांची मोटर सायकलद्वारे व पायी गस्त करुन वाहतुकीस अडथळा होणार नाही याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

तसेच हरविलेल्या व्यक्ती, वस्तु, चोरीस गेलेली मालमत्ता, अन्न व भेसळ तसेच ज्वलनशिल वस्तु आणि अतिमहनिय व महनिय व्यक्तींचे दौरे, पोलीस बंदोबस्ताचे नियंत्रण व पर्यवेक्षण यासाठी स्वंतत्र पोलीस नियंत्रण कक्ष सुमारे 40 ठिकाणच्या CCTV कॅमेरे, बिनतारी संदेश दळणवळण आणि केंद्रित स्पिकर सिस्टीम असा अद्यावत पोलीस नियंत्रण कक्ष उभारण्यात आलेला आहे.

error: Content is protected !!