सिंधुदुर्ग : सिंधू रत्न भजन सुधारक मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महिला भजनी बुवा आणि डबलबारी भजनी बुवा यांची तातडीची सभा सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी दहा वाजता भालचंद्र महाराज मठ कणकवली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेसाठी सिंधुदुर्गातील सर्व महिला भजनी बुवांनी, मग ते भजन स्पर्धेमध्ये भाग घेणारे असो, सिंगल भजन सेवा देणारे असो किंवा डबलबारी भजन करणारी असो, ज्या ज्या महिलांचा भजन क्षेत्राशी संबंध आहे अशा सर्व महिला भजनी बुवांनी महिला रसिकांनी महिला वादकांनी या सभेसाठी आवर्जून उपस्थित राहायचं आहे.
ज्या भजनीबुवांना या तातडीच्या बैठकीसाठी यायला जमत नसेल अशा भजनी बुवांनी स्वतःचे एक-दोन प्रतिनिधी पाठवून द्यायचे आहेत.
तेव्हा कृपया सर्व महिला भजनी बुवांनी न विसरता या सभेला रहावे असे आवाहन सिंधू रत्न भजन सुधारक मंडळ सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.