वेताळ प्रतिष्ठानच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलचे यश

मराठी वक्तृत्व स्पर्धेत प्राजक्ता आणि अमृताचे यश तर इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत अमृता,सेजल सह संजिव चे उल्लेखनीय यश

वेंगुर्ले : अश्वमेध महोत्सव तुळस आयोजित वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले.


मराठी वक्तृत्व स्पर्धेसाठी मराठी अभिजात पण पुढे काय या विषयावर भाष्य करताना इयत्ता आठवीची कु.प्राजक्ता अनिल भोकरे हिने द्वितीय क्रमांक पटकावला तर या स्पर्धेत नववीच्या कु.अमृता दत्तराम नवार हिने या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.


इंग्रजी माध्यमातून घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत द ग्रेट लीडर संभाजी हा विषय होता यामध्ये द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाची कु.अमृता दत्ताराम नवार तर तृतीय क्रमांक नववीच्या कु.सेजल नितीन रेडकर आणि उत्तेजनार्थ क्रमांक आठवीच्या कु.संजीव सुनील कांबळी यांने पटकावला..

न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची यशाची पंरपरा कायम राखत विद्यालयाचा मराठी आणि इंग्रजी विषयाच्या वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवत शाळेच्या शिरापेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या यशस्वी विद्यार्थ्यांना या प्रशालेचे उपक्रमशिल अध्यापक प्रा.वैभव खानोलकर आणि लिपिक अजित केरकर यांच्या सोबतच इंग्रजी विषयासाठी सौ.मोहिते मॅडम , भिसे मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केले होते.


या विजेत्या स्पर्धकांचे विशेष अभिनंदन न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री विरेंद्र कामत -आडारकर
उपाध्यक्ष निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर, सचिव रांगोळीकार रमेश नरसुले ,सदस्य निलेश मांजरेकर आणि इतर सर्व संस्था पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती, पालक संघ यांनी केले असुन या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध निवेदक तसेच मुलाखतकार, उपक्रमशील अध्यापक वैभव खानोलकर यांच्या सह लिपिक अजित केरकर मोहिते मॅडम भिसे मॅडम व या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांचे ही विशेष अभिनंदन केले आहे.


सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत यश मिळवणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाचे या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे

error: Content is protected !!