सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज मालवण तालुका युवक अध्यक्षपदी मनोहर अरुण पाताडे यांची नियुक्ती

संतोष हिवाळेकर / पोईप


सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ तालुका मालवणच्या युवक अध्यक्षपदी सुकळवाड येथील मनोहर अरुण पाताडे यांची नियुक्ती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे व कोषाध्यक्ष नामदेव जाधव यांनी संयुक्तरित्या आज जाहीर केली.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कार्यकारिणीच्या वेळी संघटनेने ही निवड जाहीर करून श्री.मनोहर पाताडे यांना नियुक्तीपत्र दिले.यावेळी जिल्हाध्यक्ष सुजित जाधव,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव,उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण,भवन समिती सहप्रमुख राजन वालावलकर,जिल्हा सदस्य आनंद जाधव,शिक्षण समिती प्रमुख प्रशांत चव्हाण,कणकवली कार्याध्यक्ष महेंद्र चव्हाण,महेंद्र देवरुखकर, नितीन पवार,संतोष जाधव,अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.
श्री.पाताडे यांच्या या निवडीबद्दल त्यांचे मित्रमंडळी तसेच समाजबांध व यांच्यावतीने अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!