कुडाळ : व्हॉट्सॲपवर धमकी दिल्याप्रकरणी कुडाळचे नगरसेवक उदय मांजरेकर यांच्यावर कुडाळ पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअँपवर स्टेटस ठेवल्याच्या रागातून नगरसेवक उदय मांजरेकर यांनी व्हॉट्सअँपवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शखाप्रमुख धिरेंद्र उर्फ गोट्या चव्हाण यांना शाखेत येऊन मारणार अशी धमकी दिली होती. याबाबत धिरेंद्र उर्फ गोट्या चव्हाण यांनी कुडाळ पोलिसात तक्रार दिली असून आपल्या जीवितास धोका निर्माण झाल्यास उदय मांजरेकर यांना जबाबदार धरावे अशी असे तक्रार अर्जात म्हटले आहे.