माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेत प्रवेश
मालवण : आ. वैभव नाईक यांनी गेल्या १० वर्षात मतदार संघात केलेली विकास कामे,जनतेचे सोडवलेले प्रश्न याचे फलित निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या झंझावाती दौऱ्यात दिसून येत आहे. ज्या-ज्या गावात आमदार वैभव नाईक पोहोचतात त्या ठिकाणचे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत.आज मालवण तालुक्यातील वराड गावातील युवकांनी आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून माजी आमदार. परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत आज कणकवली विजय भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.यावेळी माजी. आमदार परशुराम उपरकर यांनी सर्व युवकांचे शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.
यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले आ. वैभव नाईक हे सर्व सामान्य जनतेमध्ये वावरुन सर्वसामान्यांच्या वेळप्रसंगाला धावुन जाणारे आमदार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आ.वैभव नाईक सातत्याने करतात.एक हक्काचे आमदार म्हणून आम्हाला त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असून त्याच विश्वासातून आम्ही ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत आहोत.असे प्रवेशकर्ते यांनी सांगितले.
यावेळी ओमकार रावले, हर्षद मिठबावकर, कुणाल मिठबावकर, ओमकार फोपळे, अभिषेक टेमकर, पंकज म्हाडगुत या युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
याप्रसंगी कट्टा ग्रामपंचायत सदस्य बाबू टेंबुलकर, युवासेना विभागप्रमुख वंदेश ढोलम ,रुपेश आमडोसकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.