कुडाळ : आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यात आणलेल्या प्रतिभा दूध डेअरी कडून जिल्ह्यातल्या ११२ दूध उत्पादक संस्थांना आणि वैयक्तिक दूध उत्पादक तसंच वाहतूकदार याना त्यांचे देणे असलेले २ कोटी ७८ लाख रुपये १८ नोव्हेंबरपूर्वी व्याजासहित द्यावेत. अशी मागणी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे. निवडणुकीच्या काळात लोकांना पैसे वाटण्यापेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे राणेंनी द्यावेत असंही सतीश सावंत यांनी सांगितलं. कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय पडते, बबन बोभाटे, विद्याप्रसाद बांदेकर, सचिन काळप, नगरसेवक उदय कुडाळकर, श्री. म्हाडेश्वर, सुशील चिंदरकर, संतोष शिरसाट आदी उपस्थित होते.