दहावी परीक्षेत विद्यामंदिर हायस्कूलची विद्यार्थिनी विधी विरेंद्र चिंदरकर हिने ९९.४० टक्के गुण मिळवून कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.त्याबद्दल आज माजी आमदार वैभव नाईक, शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी तिचा शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव,सचिन सावंत, राजू राठोड, उत्तम लोके, वडील विरेंद्र चिंदरकर उपस्थित होते.