सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा मुसलमांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही

आ. निलेश राणेंचा थेट इशारा

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा मुसलमांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. हा फक्त आता इशारा देतो जर अशा घटना घडल्या तर जिल्ह्यात काय घडेल याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी मुसलमानांना खडसावले. दरम्यान झाराप भावई मंदिर येथे महाआरती झाल्यानंतर सकल हिंदू समाजाला आमदार निलेश राणे यांनी संबोधित केले.

झाराप येथे पर्यटकाला मारहाण केल्यानंतर त्या ठिकाणच्या हॉटेल व्यवसायिकाच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती हा हॉटेल मालक मुस्लिम समाजाचा होता आणि त्यांच्या कुटुंबीयाने त्या पर्यटकाला बेदम मारहाण केली होती या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यात निवेदनही देण्यात आले होते दरम्यान त्या ठिकाणी असलेली टपरी काढण्याचा इशारा आमदार निलेश राणे यांनी दिला होता या इशा-यानंतर काही तासात ही टपरी काढण्यात आली. दरम्यान झाराप येथे येणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले आणि भावई मंदिर येथे महाआरती करणार असल्याचे सांगितले. त्या ठिकाणी सकल हिंदू समाजाने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आज (बुधवारी) झाराप भावई मंदिर येथे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, झाराप सरपंच सौ. मेस्त्री, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, किसन मांजरेकर, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, शिवसेना प्रवक्ता रत्नाकर जोशी, दादा सामंत, विनायक राणे, राकेश कांदे, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, नगरसेविका चांदणी कांबळी, नयना मांजरेकर, श्रुती वर्दम आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार निलेश आणि यांनी सांगितले की, एका पर्यटकाला या मुस्लिम कुटुंबीयांकडून मारहाण होत होती त्यावेळी त्या ठिकाणी अनेक हिंदू पाहत होते. हे आमचे दुर्दैव आहे छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरला बंदिस्त करण्यात आले त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारे हिंदू पाहत राहिले. या देशामध्ये २० टक्के मुस्लिम आहेत आणि आपण हिंदू ८० टक्के आहोत. मात्र ते आम्हाला कोणत्या प्रकारे कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे तुम्ही बघत आहात. लव जिहाद, लँड जिहाद अशा प्रकारचे विविध जिहाद केले जात आहेत. आता आपण सुद्धा गप्प राहून चालणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची दादागिरी न होती. पण आता ही दादागिरी सुरू झाली आहे. ही दादागिरी आम्ही तरी खपवून घेणार नाही. आम्हाला धर्म महत्त्वाचा आहे. राजकारण नंतर, मतांसाठी आम्ही असे प्रकार कदापी खपवून घेणार नाही. जर तुम्ही आमच्यावर हात उचलाल तर हात उकडून टाकण्याची सुद्धा हिम्मत आमच्यामध्ये आहे. असे सांगून सिंधुदुर्गात यापुढे अशा प्रकारची जर मस्ती कोणी केली तर त्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.


तसेच ते म्हणाले की मुसलमान हे सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत झाले आहेत आणि त्या ठिकाणी ते दादागिरी करतात. ही दादागिरी सुद्धा मोडीत काढली पाहिजे. जे मुसलमान पाकिस्तान आणि बांगलादेशचे गुणगान गात आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही. माझ्या मतदारसंघात ही मस्ती चालून गेली घेतली जाणार नाही. असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा साईल यांनी केले तर प्रास्ताविक प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी केले.

error: Content is protected !!