नवलराज काळे यांच्या मागणीनुसार निलेश राणे यांनी तांडा वस्ती सुधार योजनेतून कोट्यावधी निधी केला मंजूर
गेले दहा वर्षात वैभव नाईक यांनी धनगर समाजासाठी काहीच केलं नाही जनता त्यांना या निवडणुकीत घरचा रस्ता दाखवेल – दीपक खरात
कुडाळ : हाताला धरून समाजकारण शिकवणाऱ्या गुरु समान नवलराज काळे यांच्या वरती नवनाथ झोरे नी केलेले टीका हास्यास्पद,कोण नवनाथ झोरे धनगर समाजासाठी त्यांच योगदान काय? ज्याला आमचे नेते नवलराज काळे यांनी समाजकारणात आणलं स्वतः लेटर पॅड वरती मालवण तालुक्यातील समाजाचे प्रश्न लिहून देऊन प्रशासनाकडे पाठपुरावा करायला सांगितला तो सुद्धा आयता पाठपुरावा करण्याची क्षमता नसणारे नवनाथ झोरेनी सामाजिक पदावर असताना समाजाचे किती विषय मार्गी लावले या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावे. माजी खासदार निलेश राणे यांनी धनगर समाजासाठी काय केले ते आम्ही पुराव्यानिशी दाखवू परंतु तुमच्यात हिंमत आहे का नवनाथ आमदार वैभव नाईक यांनी काय काय कामे केली ती जाहीर करण्याची. हिम्मत असेल तर समोरासमोर या आणि पुरावे द्या. नवलराज काळे यांनी मालवण कुडाळ मधील अनेक धनगर वस्त्यांना निधी मिळवण्यासाठी भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदावरून प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यांच्यासोबत आम्ही देखील काम पाहत आहोत. कोट्यावधी निधी तांडा वस्तीतून मंजूर करून आणला आहे. ज्या ठिकाणी जमिनीच्या अडचणी आहेत त्या ठिकाणी स्वतः जमीन मालकांची खुद्द नवलराज काळे संपर्क करीत आहेत. त्यामुळे नवलराज काळे जिथे असतील तिथेच धनगर समाजाचे बांधव असतील. नवलराज काळे दांडगा पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणारा नेतृत्व आहे याचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. येणाऱ्या काळात ही सर्व कामे मार्गे लागतील आणि ती सर्व कामे निलेश राणे साहेब यांच्या माध्यमातूनच होतील. तुमच्या वैभव नाईक यांनी गेले दहा वर्षे धनगर समाजाचा फक्त वापर केला आहे. निवडणुकीपूर्ती समाजाला जवळ करणे एवढाच धंदा वैभव नाईक यांनी गेले दहा वर्ष राबवला. धनगर समाज आता सुज्ञ आहे. या निवडणुकीतून धनगर समाज नक्कीच वैभव नाईकांना त्यांची जागा दाखवून देईल. यावेळी आमदार म्हणून निलेश राणेच निवडून येतील आणि राणे साहेबच धनगर समाजाचा विकास करू शकतात हे वारंवार या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिद्ध झाल आहे. त्यामुळे टीका करत असताना विचारपूर्वक करा अन्यथा गाठ आमच्याशी आहे. असा थेट इशाराच भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा सरचिटणीस तथा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख दीपक खरात यांनी नवनाथ झोरे यांना दिला आहे. जे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे माजी उपाध्यक्ष म्हणून मिरवता त्या पदावर नवलराज काळे यांनीच तुमची निवड केली होती. परंतु त्या पदावर ती आपण योग्य काम करू शकला नाहीत समाजाला न्याय देऊ शकला नाहीत म्हणून आपल्याला संघटनेतून फेरनिवड मिळाली नाही. नवलराज काळे यांच्याच मुळे पद आणि प्रतिष्ठा तुम्हाला मिळाली होती. दुसऱ्या कोणत्याही संघटनेने तुम्हाला आपलंसं केलं नाही हे विसरू नका. ज्या वैभव नाईकांची तळी तुम्ही उचलता त्यांनी देखील पक्षात तुम्हाला काय वागणूक दिले आहे ती आम्हा सगळ्या समाजाला ठाऊक आहे. साधा स्वतःच्या घराकडे जाणारा रस्ता सुद्धा तुम्हाला वैभव नाईक यांच्याकडून मंजूर करून घेता आला नाही. त्यामुळे वैभव नाईकांसाठी समाजाच्या नेतृत्वावरती (गुरु समान व्यक्तिमत्त्वाच्या विरोधात) टीका करू नका नवनाथ झोरे यांना दीपक खरात यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.