स्व. भाईसाहेब सावंत यांच्या माजगांव येथील समाधीस्थळी मा. आम. वैभव नाईक यांनी वाहिली आदरांजली

आर. पी. डी. हायस्कुल येथे स्मरणिका प्रकाशन सोहळ्याला वैभव नाईक यांची उपस्थिती

     लोकनेते, नामदार स्व. भाईसाहेब सावंत यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी तालुक्यातील माजगांव येथील त्यांच्या समाधीस्थळी माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन भाईसाहेब सावंत यांना आदरांजली वाहिली. तसेच आर. पी. डी. हायस्कुल  येथे  स्मरणिका प्रकाशन सोहळ्याला देखील वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार राजन तेली,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत,अमरसेन सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, विकास सावंत,दिलीप नार्वेकर,दिनेश नागवेकर,सी.एल. नाईक,व्ही. बी. नाईक,बबन साळगावकर, रुपेश राऊळ, विक्रांत सावंत, चंद्रकांत कासार, संजय कानसे, राजू सावंत, ज्ञानेश्वर सावंत, अशोक धुरी,हरिष काष्टे आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!