वेंगुर्ले : आपल्या मित्रांसोबत शिरोडा वेळागर येथे फिरण्यासाठी आलेल्या एका रशियन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी रेडी येथील रहिवासी सचिन शशिकांत रेडकर (वय ४०) यांच्यावर वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ जानेवारीला १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, वालेरिया दिमित्री बिलिव्हा (वय २३, रा. रशियन कॉलेज, व्यवसाय मार्केटिंग व टुरिझम, सध्या रा. गोवा) असे त्या रशियन युवतीचे नाव आहे. ती आपल्या मित्रांसोबत शिरोडा- वेळागर येथे फिरण्यासाठी आली असता फिरून झाल्यानंतर पुन्हा आपल्या गोवा येथील हॉटेलमध्ये जात असताना रेडी हुडा येथे आले असता त्यांच्या मित्रांची गाडी स्लीप झाल्याने त्यांना सावरण्यासाठी वालेरिया बिलीव्हा या थांबल्या असता संबधित युवकाने तेथे येऊन त्यांच्या अंगाला स्पर्श करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे, अशी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक तपास पीसीएसआय योगेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले करत आहेत.

वेंगुर्ले येथे रशियन युवतीवर विनयभंग…
1
/
95
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक
श्री. रवी कुडाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिल्हाधिकाऱ्यांच्या 21 टेंडर च्या निर्णयावर बंडू हर्णे यांची पत्रकार परिषद #kankavli
योगेश मोबाईल शॉपीचा मान्सून धमाका #kudal #sindhudurg
कणकवली उड्डाण पुलाखालील फळ, फुले, भाजी मार्केट विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करणार- संदेश पारकर
शिवसेना वाढीसाठी संघटनात्मक बांधणी करणार - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
कणकवलीत १ कोटींच्या "श्री स्वयंभू नमो उद्यान"चे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन #kankavli
"स्मार्ट मीटरची जबरदस्ती खपवून घेणार नाही" - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
1
/
95

Subscribe










