पालकमंत्री नितेश राणे, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठया वराड-सोनवडेपार पुलाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार ३१ जानेवारी सायंकाळी 5 वा. खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
२०१३ साली तात्कालीन पालकमंत्री नारायणराव राणेंच्या संकल्पनेतुन कर्ली खाडीवर पंतप्रधान सडक योजनेतून हा पूल प्रस्तावित करण्यात आला. त्या नंतरच्या काळात रखडलेला हा पूल आमदार निलेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा करून लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न केले, अनेक समस्यांवर तोडगा काढला, वेळोवेळी वराड पुलाच्या ठिकाणी भेट दिली आणि कित्येक वर्षे रखडलेल वराड पुलाच काम पूर्णत्वास नेण्यात महत्वाची भुमिका बजावली.
एकूणच यां लोकार्पण सोहल्यास प्रशासकीय प्रमुख, विविध खात्याचे अधिकारी व अन्य मान्यवर यांचीही उपस्थिती असणार आहे.
एकूणच अनेक वर्षांची मागणी पुर्ण होत असल्याने ग्रामस्थ आणि प्रवासी यांनीही समाधान व्यक्त केले आहे.













