मालवण नगरपरिषदेच्या हद्दीतील मोकाट कुत्रे आणि गुरे यांच्या बंदोबस्तासाठी धुरीवाडा येथील नागरिक आक्रमक

जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांच्या आमरण उपोषणाला यश

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचे अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

मालवण : नगरपरिषदेच्या हद्दीतील मोकाट कुत्रे आणि गुरे यांच्या बंदोबस्तासाठी धुरीवाडा येथील नागरिक आक्रमक झाले. जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांनी आमरण उपोषण सुरू केले.


मालवण शहरात अनेक वर्षापासून भटकी कुत्री,गुरे यांची संख्या वाढली आहे. शहरात सातत्याने मोकाट कुत्री वृद्ध, लहान मुलांवर हल्ले करून जखमी करत आहेत. त्याचबरोबर अपघात होत आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी धुरीवाडा येथील ज्येष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांनी आमरण उपोषण सुरू केले. कमलाकर खोत म्हणाले. ‘रात्री कुत्री वाहनांमागे धावत येऊन हल्ला करीत आहेत. वारंवार पालिकेकडे मागणी करूनही पालिका लक्ष देत नाही. त्यामुळे मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे.काही दिवसांपूर्वी लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यामुळे तातडीने याकडे लक्ष द्यावे आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा असे ते म्हणाले.

हे उपोषण मालवण पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कोल्हे, मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी झिरगे, मालवण नगरपरिषद अधिकारी महेश परब मंदार केळुसकर, आचरेकर उपोषण स्थळी दाखल झाले होते. कुत्रे निर्बिजीकरणाचे कार्यारंभ आदेश लवकरच देण्याचे मान्य केले. मोकाट जनावरांची पुन्हा टेंडर प्रक्रिया करण्याचे मान्य केले. पी.आय. कोल्हे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. यावेळी जेष्ट नागरिक व्यापारी प्रथिष्टीत नागरिक यांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक यतिन खोत, महेश जानकर, समाजसेविका शिल्पा खोत, नागेसेविक दर्शन कासवकर, भाई कासवकर, मंदार ओरोसकर, मनोज मोंडकर, निखिल शिंदे, साई वाघ, माजी शिक्षक कोळंबकर सर, लक्ष्मीकांत खोबरेकर, अजीत बांदेकर, उमेश नेरुरकर, उमेश मांजरेकर, शशी खोत, गणेश चव्हाण, शांति तोंडवळकर, बंड्या सरमळकर आदी नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!