आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेचा कुडाळ तालुका कार्यकर्ता मेळावा इच्छापूर्ती मंगल कार्यालय सिंधुदुर्ग येथे संपन्न झाला. यावेळी भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवधनुष्य हाती घेतले.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, संजू परब, रुपेश पावसकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, बबन शिंदे, विनायक राणे,ओंकार तेली, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, देवेंद्र सामंत, राकेश कांदे, किशोर मर्गज, राजन भगत, माजी सभापती नूतन आइर, नागेश आईर, डॉ. अरुण गोडकर, नित्यानंद कांदळगावकर, निखिल कांदळगावकर, दिनेश वारंग, साजुराम नाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

error: Content is protected !!