वैभववाडी : अखेर त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असून वैभववाडी येथील वैभव लक्ष्मी पेट्रोल पंप येथे अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याची आज दुसऱ्या दिवशी ओळख पटली असून कोकिसरे गुरववाडी येथील लक्ष्मण यशवंत गुरव (32) याचा असून बुधवारी दिवसभर सांगूळवाडी येथे क्रिकेट खेळायला गेला होता. त्याला दारूचे व्यसन होते संध्याकाळी दारु पिऊन वैभव लक्ष्मी पेट्रोल पंप येथे एका बाजूला झोपला असावा अणि ट्रक किंवा डंपर च्या चाकाखाली चिरडला गेला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
लक्ष्मण हा आई सोबत राहत होता वडील आजारी असल्याने मुंबई येथे गेले आहेत. तर लक्ष्मण हा बुधवारी दिवसभर सांगुळवाडी येथे क्रिकेट मॅच बघण्यासाठी गेला होता रात्रभर पेट्रोल पंपावर झोपला घरी गेला नाही. ट्रक किंवा डंपर चालकाला रात्रीच्या वेळी दिसून न आल्याने गाडीचे चाक अंगावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दोन दिवस बातमी पाहून नातेवाईक लक्ष्मण याचा छोटा भाऊ धनंजय याने ओळख पटविली. पोलिसांनी सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.