सिंधुदुर्ग : वैभववाडी येथील ठाकरे सेनेचे दिग्गज नेते अतुल रावराणे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केले आहे. शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्त केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेमध्ये सक्रियपणे कार्यरत होते. परंतु आज त्यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे गटाला फार मोठा धक्का बसला आहे. भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे अगदी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे यापुढे ते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.