अमित ठाकरे यांचं वक्तव्य
मुंबई प्रतिनिधी: २०२१ मधे शिवसेना मधे झालेला मोठा बंडाने त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राला खिळवून ठेवलं होत.आणि त्या बंडानंतरच भाजपा आणि त्यावेळचा एकनाथ शिंदे गट एकत्र आले. त्यानंतर शिंदे गटाला शिवसेना हे पक्ष नाव मिळाले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. मात्र याच गोष्टीला धरून आता विधानसभा निवडणूक माहीम चे उमेदवार अमित ठाकरे यांनी केलेले वक्तव्य राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे. २०२१ च्या जून महिन्यात शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना घेऊन भाजपाला समर्थन दिलं. त्यामुळे शिवसेनेकडे आणि पर्यायाने महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्याने त्यांना सत्ता सोडावी लागली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. तर, दुसरीकडे शिवसेना (शिंदे गटाने) आणि भाजपाने त्यांच्याकडे असलेलं बहुमत सिद्ध केलं अन् एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.
काय म्हणाले अमित ठाकरे?
याच पार्शवभूमीवर अमित ठाकरे म्हणाले,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं नाव आणि चिन्ह घेऊन चूक केली आहे .एका वृत्त वहिनीला मुलाखत देताना अमित ठाकरे म्हणाले,. असं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केले आहे. “एकनाथ शिंदे यांनी पक्षाचं चिन्हआणि नाव घेतलं, ते चुकीचं केलं. नागरिक म्हणून पाहताना ते मला चुकीचं वाटतंय. पक्षचिन्ह आणि पक्षनाव बाळासाहेबांचं आहे, ते त्यांचंच राहायला पाहिजे होतं. लोकांच्या विश्वासाने त्यांनी हे निर्माण केलं होतं.”
दरम्यान अमित ठाकरे यांच्या या वक्तव्याला एकनाथ शिंदे आता काय प्रत्युत्तर देत आहेत याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.