वालावल येथिल अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन, तिला जिवे मारण्याची धमकी..

कुडाळ : एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन, तिला ठार जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी संशयित वालावल (आरोग्य केंद्र नजिक) येथील रवींद्र वसंत मेस्त्री (वय ५८) याच्यावर निवती पोलिस ठाण्यात पोस्को कलम ४,.६,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलींच्या आईने सदर फिर्याद निवती पोलिस स्टेशन वर दाखल केली आहे. मेस्त्री याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वालावल गावात अतिशय घृणास्पद अशी घटना घडली त्याला आज ९ ते १० दिवस झाले तरीही जणू काही आपल्या आसपास घडलेच नाही अश्या प्रकारचे वातावरण गावात दिसत आहे. कारण ज्या मुलीवर अत्याचार झाला ती आपली मुलगी, बहीण नाही असेच बहुतेक नागरिकांना वाटत असावे. त्या पिडीत मुलीचे आई वडील गरीब आहेत. अन्याय ग्रस्थ गरीब कुटूंबासाठी कोणीच कधीच पुढाकार घेत नसतो.. तेच नामांकीत कुटूंबात अस घडल असत तर सगळेच धावले असते. असं दिसून येतं आहे. पण आपण जर शांत राहिलो तर तीही वेळ दूर नाही स्वतःवर येईल कदाचीत याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची संख्या दुर्दैवाने वाढलीय हे गावातील नागरिकांना माहीत असेलच.

या घटनेचे कोणीही राजकारण न करता आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी अग्रक्रमाने प्रयत्न केले पाहिजेत. नाहीतर पीडितेच्या कौटुंबिक परिस्थितीचा फायदा घेऊन, राजकीय दबाव आणून थोड्याच दिवसात आरोपी निर्दोष मुक्त होईल आणि सर्व फक्त यंत्रणेला दोष देत बसतील हे योग्य नाही म्हणून आत्ताच योग्य वेळ आहे आवाज उठवण्यासाची, आरोपीला कठोर शिक्षा करायला भाग पाडले पाहिजे. सर्व नागरिकांनी मिळून या घटनेच्या नराधमाला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

error: Content is protected !!