दोडामार्ग : कामानिमित्त गोव्याहून घरी परतत असताना दोडामार्ग चेकपोस्ट नजिक दोन दुचाकी स्वरांना टाटा पीकअपने भरधाव वेगात येत जोरदार धडक दिली. यामध्ये दोन दुचाकिस्वार जखमी झाले. यातील महेश इब्रामपूरकर (40) राहणार गोवा इब्रामपूर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले आहे.तर मणेरी येथील पोलीस पाटील राजाराम कांबळे हे ही जखमी झाले असून त्यांच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास गोव्यातील काम आटोपून महेश इब्रामपूरकर व राजाराम कांबळे हे स्वतःच्या दुचाकीने दोडामार्ग चेकपस्ट येथे पोहोचले असता दोघांच्याही गाड्या घराच्या दिशेने येत असताना समोरून विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या टाटा पीकअप गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की समोरून उभ्या असलेल्या खाजगी बसच्या चाका खाली गाडी फेकली गेली यां गंभीर अपघातात इब्रामपूरकर यांची तबेत नाजूक असल्याचे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातून सांगण्यात आले. तर मणेरी येथील पोलीस पाटील राजाराम कांबळे यांना ही तोंडाला मार लागला असून त्यांच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार सूरू आहेत. दरम्यान टाटा पीकअपच्या चालकला दोडामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.













