गोळवण गावच्या सौ. सुचित्रा शशिकांत माळकर यांची भारतीय सुरक्षाव्यवस्था क्षेत्रात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती.

गोळवणच्या शिरपेचात मानाचा तुरा

मालवण : जीद्द, प्रचंड मेहनत करण्याची तयारी आणि आत्मविश्वास असेल तर ध्येय गाठणे अवघड नसते. गोळवण गावातील वरची गावडेवाडी येथील एक स्त्री स्वकर्तृत्वावर आपल्या ध्येयशक्तीने, महत्वाकांक्षी लढवय्या प्रयत्नाने देशाच्या सुरक्षाव्यवस्था क्षेत्रात स्वतःची अशी खास वेगळी ओळख निर्माण करून आपल्या प्रामाणिक कर्तृत्वाने एक वेगळाच ठसा उमटवते.
गोळवण गावच्या सौ.सुचित्रा शशिकांत माळकर यांची भारत सरकारच्या सुरक्षाव्यवस्था क्षेत्रात (Assistant police inspecter) म्हणून पदोन्नती झाली आहे.गोळवण ग्रामस्थ विश्वस्त मुंबई चे सन्माननीय आधारस्तंभ मार्गदर्शक श्री.शशिकांत माळकर साहेब यांच्या धर्मपत्नी सौ.‌सुचित्रा शशिकांत माळकर यांना ‘स्टार’ सन्मानित करण्यात आले.आज गोळवण गावच्या इतिहासात मानचा तुरा रोवला गेला. आजपासून त्यांनी
सहायक उपनिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे .आता त्या सद्ध्या राजकोट येते सेवेत कार्यरत आहेत. लवकरच त्या मुंबईमध्ये परततील. दहा दिवसानंतर मुंबईमध्ये आल्यावर मुंबईत त्यांना शासनातर्फे मेडल देऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे. जिद्द आणि चिकाटीने काम केल्यानंतर देव सर्व देतो फक्त ध्येय पाहिजे बस एक स्त्री असुनही आणि आपला संसार सांभाळून आज ३० वर्षे नोकरी करत आहेत. संपूर्ण भारतभर पोस्टिंग असल्याने सेवाकार्य करताना अनेक राज्यात त्या ड्युटी सांभाळून आपल्या कोकणातील गोळवण गावच्या घरी गणेशोत्सव कधी चुकवला नाही. श्रीदेव रवळनाथांच्या कृपेने, श्रीदेव गावडे पूर्वज,भावईमाता यांचा आशीर्वाद पाठीशी भक्कमपणे असल्याने हे सेवाकार्य करताना कधी अडीअडचणीच्यावेळी कधी धैर्य खचले नाही.नेहमी हिंमत आणि आत्मविश्वास सोबत होते.सौ. सुचित्रा शशिकांत माळकर वहिनी देशातील अनेक राज्यात सेवेत कार्यरत असताना पती शशिकांत माळकर साहेब यांनी आपली बॅंकिंगची नोकरी सांभाळून, सामाजिक बांधिलकी जपत समाज कार्य करत असतानाही कौटुंबिक जबाबदारी सांभाळून पती शशिकांत माळकर साहेब यांच्या सहकार्याने सर्व संकटे पायदळी तुडवून मार्गक्रमण करत राहिल्या.शशिकांत माळकर साहेब स्वतः बॅंकिंग क्षेत्रात कार्यरत असताना मुलांचे शिक्षण, संस्कार याबतीत दोघांनीही जातीने लक्ष दिले. त्यांच्या मुलं आज उच्च शिक्षण घेऊन आपल्या आईवडिलांच्या संस्काराचा वारसा चालवत आहेत.शशिकांत माळकर यांच्या मुलाने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले आहे.

error: Content is protected !!