सावंतवाडी प्रतिनिधी:काल दिनांक ३० ऑक्टोबर रोज रात्री उशिरा अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर एका अज्ञाताने हल्ला केला.यात त्यांचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना मळगाव रेल्वेस्टेशन परिसरात घडली असून हल्लेखोराला स्थानिक लोकांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्या बाबत बोलताना विशाल परब म्हणाले,जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी निवडणूक लढणार ,कोणी कितीही प्रयत्न केले तरी मी हार मानणार नाही.दरम्यान हल्लेखोराला विचारले असता ,आपल्याला गाडी मधून आणून कोणीतरी इथे सोडले आणि हल्ला करायला सांगितले असे हल्लेखोर बोलला.हा घातपाताचा प्रयत्न असल्याची शक्यता आता स्थानिकांमधे व्यक्त होत आहे.