कुडाळ प्रतिनिधी: पळसंब मनसे शाखा अध्यक्ष रुपेश पुजारे व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.आज दिनांक ३० ऑक्टोबर रोजी कुडाळ मालवण विधानसभेचे महायुती उमदेवार निलेश राणे तसेच दत्ता सामंत यांच्या उपस्थिती पक्ष प्रवेश केला असून युवासेना जिल्हाधिकारी प्रितम गावडे यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश करण्यात आला.दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सौ. दक्षता सावंत यांची शिवसेना महिला शाखा पदी नियुक्ती करण्यात आली आहे.