शिक्षकांच्या रखडलेल्या पगारावर आदिती तटकरे यांचं मोठं विधान

पुणे: लाडकी बहिण योजनेमुळं राज्यातील शिक्षकांच्या पगारावर याचा मोठा परिणाम होणार असल्याच्या चर्चा होत होत्या. नव्या वर्षात शिक्षकांना दरमहिन्याला होणाऱ्या पगाराची प्रतिक्षा करावी लागणार असे सांगण्यात येत होते. दरम्यान, राज्याच्या कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आज आदिती तटकरे पुणे दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी श्रीमंत दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेतलं. राज्यात सुख समृद्धी लाभू दे असं गणपतीला साकडं घातलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. विशेष म्हणजे लाडकी बहिण योजनेवर. नागपूर बजेट मध्ये निधी तरतूद केली होती,

24 तारखेपासून लाडकी बहिण हप्ते सुरु झाले आहेत. दुसऱ्या विभागाचा कुठलाही निधी लाडकी बहिण कडे वळवण्यात आलेला नाही. प्रत्येकजण ज्या त्या विभागाचे मंत्री निधी पाहत आहेत आणि त्या त्या विभागाचे मंत्री त्यावर कामदेखील करत आहेत. तसेच, शिक्षकांचा पगार होणार नाही अशी चुकीची अफवा पसरवली जात आहे. त्यांचे वेळेत पगार होतील असं तटकरे यावेळी म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिक्षकांच्या पगारावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे.

error: Content is protected !!