पिंगुळीचा सिद्धार्थ सौदागर बॉक्सिंग डे टेस्ट साठी विशेष निमंत्रित

सिद्धार्थ ऑस्ट्रेलियाला रवाना

कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी येथील सिद्धार्थ सुनील सौदागर याला ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्नमध्ये होणाऱ्या “बॉर्डर गावस्कर ट्रॉफी “च्या(बॉक्सिंग डे क्रिकेट टेस्ट मॅच )चौथ्या कसोटी सामन्याच्या विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे.
हा सामना 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत एमसीजी स्टेडियमवर होणार आहे तसेच 28 डिसेंबरला तेथेच होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या विशेष सामन्यासाठीही त्याला त्या स्पर्धेचा विजेता म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. ग्लान्स व स्टार स्पोर्ट्स यांच्या विद्यमाने त्याला ही संधी मिळाली आहे. या दोन्ही सामन्यांना उपस्थित राहण्यासाठी तो आज ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. सिद्धार्थ याला यापूर्वी 2016 मध्ये आरसीबी फॅन आर्मी कडून बेंगलोर येथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती. तसेच 2023 मध्ये मुंबई येथे झालेल्या विश्वचषकाच्या सेमी फायनल साठी त्याची विशेष स्पर्धक म्हणून निवड झाली होती. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सिद्धार्थ हा सीए सुनील सौदागर व समाजसेविका सौ शुभांगी सौदागर यांचा मुलगा आहे.

error: Content is protected !!