देवेंद्र फडणवीस घेणार मोठा निर्णय

महायुती सरकारमध्ये जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा मागास आणि नक्षलप्रभावित जिल्हा असून, त्याला राजकीय महत्त्व आहे. यापूर्वी आर. आर. पाटील, एकनाथ शिंदे, आणि फडणवीस उपमुख्यमंत्री असताना या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले होते. मुख्यमंत्रिपदावर असताना एखाद्या जिल्ह्याचे पालकत्व घेणारे फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरू शकतात. दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!