वेंगुर्ला: दाभोली-हळदणकरवाडी येथे टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात सुंदरभाटले येथील युवक जागीच ठार झाला. हा अपघात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान अपघाताचे वृत्त समजतात तेथील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.
यावेळी पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर सरपंच उदय गोवेकर ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण बांदवलकर पंचायत समितीचे माजी सदस्य समाधान बांदवलकर दादा गोवेकर वायंगणी उपसरपंच रवींद्र धोंड, दिलीप बांदवलकर, मनोज कोळेकर सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोशी, उमेश जोशी, प्रकाश बांदवलकर गणेश हळदणकर सिद्धेश प्रभू माजी सरपंच मनाली हळदणकर दाभोली ग्रामपंचायत सदस्य जया पवार आदी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी युवकाच्या नातेवाईकांना घटनेची खबर दिली असून अधिक तपास सुरू आहे.