कुडाळ प्रतिनिधी: मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. याबतची प्रतिक्रिया ‘ X ‘ पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
आ. निलेश राणे यांनी कोकण किनारपट्टीवरील पोर्टबाबतचे प्रश्न विधिमंडळात मांडले होते. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. याबद्दल आ. निलेश राणे यांनी आपल्या X अकाऊंटवरून व्हिडिओ पोस्ट करून त्यांचे आभार मानले.