जिल्हा महिला अध्यक्षा अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सिंधुदुर्ग उज्ज्वला विजय येळाविकर यांचे निवेदन
राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना दिले निवेदन
कुडाळ प्रतिनिधी: आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला आयोग आपल्यादरी अंतर्गत जनसुनावणी घेण्यात आली.यावेळी १२० तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली.यावेळी अनेक महिला आपले निवेदन घेऊन आल्या होत्या.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या जीवनमानाशी संबंधित काही गंभीर समस्या आहेत, ज्या सोडवण्यासाठी महिला आयोगाकडून तातडीने हस्तक्षेप होणे आवश्यक आहे.असे निवेदन जिल्हा महिला अध्यक्षा अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सिंधुदुर्ग उज्ज्वला विजय येळाविकर यांनी केले आहे.यावेळी विधानसभा उमेदवार अनंतराज पाटकर तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे कुडाळ तालुका अध्यक्ष विजय येळावीकर आणि कार्तिक कदम उपस्थित होते.
या निवदेनात त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांची मांडणी केली आहे.
1. आरोग्यसेवाः ग्रामीण भागातील महिलांना सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळत नाही. प्रसूतीसाठी आणि इतर आरोग्य समस्यांसाठी मोठ्या प्रमाणावर महिलांना दूरच्या शहरी रुग्णालयांवर अवलंबून रहावे लागते.
2. शिक्षण व रोजगारः मुलींना उच्च शिक्षणासाठी तसेच कौशल्य विकासाच्या संधी मर्यादित आहेत. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराच्या व उद्योजकतेच्या संधी निर्माण होणे आवश्यक आहे.
3. गृहहिंसा आणि महिलांवरील अत्याचारः जिल्ह्यातील काही भागांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा घटनांवर नियंत्रणासाठी कड़क पावले उचलणे गरजेचे आहे.
4. वाहतूक व दळणवळणाची कमतरताः महिलांना शिक्षण आणि रोजगारासाठी लांब प्रवास करावा लागतो, पण सार्वजनिक वाहतुकीची सोय अपुरी असल्याने त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.
5. महिला सक्षमीकरण कार्यक्रमांची अंमलबजावणीः महिला सक्षमीकरणासाठी असलेले शासकीय कार्यक्रम व योजना प्रभावीपणे राबविण्यात काही प्रमाणात अडथळे येत आहेत.वरील समस्या सोडवण्यासाठी आपण तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
प्रतिनिधित्व:
1. महाराष्ट्र लोकाधिकार समिती, जिल्हा उपसंघटक, सिंधुदुर्ग
2. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हाध्यक्ष (महिला), सिंधुदुर्गआपण यावर सकारात्मक कार्यवाही करून महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणाल. अशी अपेक्षा आहे. अशी विनंती यावेळी उज्ज्वला विजय येळाविकर यांनी केली.