भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची धुरा रवींद्र चव्हाण यांच्याकडे?

मुंबई प्रतिनिधी: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद हे डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. 2029 साली भाजपाने शतप्रतिशत भाजपा म्हणजेच स्वबळावर सत्तेत येण्याचा चंग बांधला आहे. त्यादृष्टीनेच ही नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 2029 मध्ये एकट्या भाजपाचे 200 हून अधिक आमदार निवडून आणण्याचं उद्दीष्ट समोर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळेच फडणवीस मुख्यमंत्री असतानाच त्यांचे निकटवर्तीय असलेल्या रविंद्र चव्हाणांवर भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी न देता पक्ष संघटना अधिक मजबूतपणे बांधण्याची जबाबदारी रविंद्र चव्हाणांच्या खांद्यावर सोपवण्यात येणार आहे.

error: Content is protected !!