वैभववाडी न.पंचायतमधील उबाठा नगरसेवकांचा कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकां आधीच भाजपचे धक्का यंत्र सुरू

वैभववाडी प्रतिनिधी: वाभवे – वैभववाडी नगरपंचायतचे उबाठा सेनेचे नगरसेवक आणि वाभवे विकास सोसायटी चे व्हॉइस चेअरमन रणजित हरिचंद्र तावडे, यांनी बाबा तावडे, अभिजित तावडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. रणजित तावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे वाभवे वैभववाडी नगरपंचायतीत उबाठाचा एकच नगरसेवक शिल्लक राहिला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुका आता लवकरच लागणार आहेत याचं पार्शवभूमीवर तावडे यांच्या भाजप प्रवेशाने उबाठा सेनेला फार मोठा धक्का आमदार नितेश राणे यांनी दिलेला आहे.

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज ओम गणेश निवासस्थानी भारतीय जनता पार्टीत हा पक्ष प्रवेश पार पडला. आम. नितेश राणे यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. नगरसेवक रणजित तावडे यांच्या भाजपा प्रवेशानंतर उबाठा गटाचे वैभववाडी नगरपंचायत मधील अस्तित्वच संपुष्टात आले आहे. रणजीत तावडे, बाबा तावडे, अभिजीत तावडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, नगरसेवक प्रदीप रावराणे, भाजपा तालुका उपाध्यक्ष स्वप्निल खानविलकर, सुतार व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!