मालवणच्या साहित्यिका वैशाली पंडित यांचा सत्कार.

ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्था व सारस्वत काँलनी डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कार्यक्रम.

प्रतिनिधी : मालवण


ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघटना व सारस्वत काँलनी डोंबिवली यांच्या विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या साहित्यिक वैशाली पंडित यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैशाली पंडित यांच्या कथा अभिवाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री मनोहर जंजीरकर यांनी वैशाली पंडित यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यानंतर संघटनेच्या सदस्य सौ. वृंदा थोरात यांनी वैशाली पंडित यांचा परीचय करून दिला.

वैशाली पंडित यांनी ज्येष्ठत्वाची पार्श्वभूमी असणा-या दोन संवाद कथा, दुधावरची साय ही भावकथा तर कोरोना एक स्वप्नरंजन हा धमाल लेख सादर केला. ‘देहशतवाद’ या लेखाने उपस्थित हेलावले. या कार्यक्रमात उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या नंतर संस्थेच्या सचिव श्रीमती अनिता भागवत यांच्या हस्ते वैशाली पंडित यांचा तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!