बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारप्रकरणी सिंधुदुर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्या नोंदविणार निषेध

जिल्हाधिकारी यांना देणार निवेदन

पदाधिकारी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, बाबुराव धुरी यांचे आवाहन

बांग्लादेशमध्ये हिंदूसमाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांकडून होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर निदर्शने सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या सोमवार दि.९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारप्रकरणी निषेध नोंदविण्यात येणार आहे.
  यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार परशुराम उपरकर,कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उपनेत्या जान्हवी सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, महिला जिल्हा संघटक श्रेया परब यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


   यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केले आहे.
error: Content is protected !!