कुडाळ प्रतिनिधी
मोबाईल हेच आपले विश्व समजणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या मातीशी जुळवून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने बांधावरची शाळा भरवली यामध्ये शेती कशा प्रकारे केली जाते हे त्यांना दाखविण्यात आले ही जिल्हास्तरीय बांधावरची शाळा तेर्सेबांबर्डे येथील पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ मध्ये झाली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी सांगितले की, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी पोटासाठी लागणारे अन्न हे मातीतून उगवणार आहे त्यामुळे मातीचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजला पाहिजे असे सांगितले.
जिल्हा परिषद, कुडाळ पंचायत समिती व तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक मध्ये बांधावरची शाळा हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, उपसभापती सिताराम तेली, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा परिषद सदस्य आरती पाटील नागेश रुपेश कानडे, तहसीलदार सचिन पाटील, कृषी अधिकारी चौगुले, सरपंच रामचंद्र परब तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये बांधावर जाऊन लावणी कशी केली जाते याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना देण्यात आले कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती नाट्य स्वरूपात दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की नवीन पिढीला शेती बद्दल आकर्षण निर्माण करणे त्यांच्यावर मातीचा संस्कार रुजवणे गरज आहे कारण जगात तंत्रज्ञान कितीही पुढारले तरी अन्न हे मातीतूनच रुजून येणार आहे त्यामुळे शेती जपली पाहिजे. तसेच आपली संस्कृती आपल्या कला सुद्धा जपल्या पाहिजे असे त्यांनी सांगितले तर यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सांगितले की कोरोनामध्ये अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला करण्यासाठी मेहनत घेतली त्यामुळे पौष्टिक आणि रासायनिक खता शिवाय भाजी पिकवली जात होते पण त्यानंतर अशा प्रकारची भाजी मिळणे कठीण झाले शेतकऱ्यांनी हा प्रयोग पुन्हा एकदा करावा जेणेकरून आपल्या मुलांना सुद्धा रसायन नसलेली भाजी मिळू शकते असे सांगून त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले प्रास्ताविक जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी केले तर आभार जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांनी मानले


Subscribe










