नीट परीक्षा घोटाळा व मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या टीकेनंतर स्वयंप्रेरणेने सुरू झालेल्या आंदोलनाला भाजप राजकीयदृष्ट्या प्रेरित दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची टीका.
मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतातील बेरोजगार युवकांना झुरळ असा उल्लेख केल्यानंतर युवा वर्गाच्या रागातून कॉकरोज जनता पार्टीचा उदय झाला. व त्यानंतर नीट परीक्षा पेपर फुटी घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोज जनता पार्टी संस्थापक अभिजीत दिपके व मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले. सदरचे आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकारने ज्या पद्धतीने हुकूमशाहीचा वापर करत आमरण उपोषणाला बसलेल्या सोनम वांगसुक यांना बळजबरीने इस्पितळात नेले व आंदोलनासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज, अश्रुधुर व रबर बुलेटचा वापर केला या गोष्टींना कुडाळ तालुका भाजपाच समर्थन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. कुडाळ नगरपंचायत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका संध्या तेरसे यांनी सत्ताधारी असून सामाजिक प्रश्नावर प्रशासनाकडून सहकार्य होत नाही म्हणून राजीनामा दिला त्यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्ष कुडाळ कोणीच उभे राहिलेले दिसून आले नाहीत.
मात्र जंतरमंतर दिल्लीतील विद्यार्थी यांचे स्वयंप्रेरणेने सुरू असलेल्या आंदोलनाला कुडाळ मधून भाजपचे समर्थन म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टिका मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.


Subscribe










