नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त १२ जुलैला चित्रकला स्पर्धा

शितल मांजरेकर यांनी केले आयोजन

कणकवली : नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या १४ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शहरविकास आघाडी, कणकवली यांच्या वतीने शहर मर्यादित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन व व्यवस्थापन शितल रामदास मांजरेकर करीत आहेत.

रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत विद्यामंदिर प्रशाला, कणकवली येथे ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धा चार गटांत आयोजित करण्यात आली असून, पहिला गट इयत्ता पहिली ते दुसरी, दुसरा गट तिसरी ते चौथी, तिसरा गट पाचवी ते सातवी आणि चौथा गट आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे.

प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच दोन उत्तेजनार्थ अशा एकूण पाच विजेत्यांची निवड करण्यात येणार असून, त्यांना आकर्षक पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नावे शितल रामदास मांजरेकर यांच्याकडे (मो. ८६००२९२९०४) नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!