कुडाळ : एस.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याचीवाडी ची पालक शिक्षक सभा नुकतीच पार पडली यावेळी एस.के.पाटील शिक्षक प्रसारक मंडळ पाट चे संचालक श्री राजेश सामंत यांनी माड्याचीवाडी विद्यालयाबद्दल गौरवउदगार काढले.यावेळी व्यासपीठावर संस्थासंचालक .श्री.महेश ठाकूर ,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अनंत सामंत, शिक्षक श्री.शामसुंदर राणे, श्री.राजेंद्र घाडीगावकर उपस्थित होते,तसेच माड्याचीवाडी विद्यालयातील विद्यार्थांचे जवळजवळ ७० पालक उपस्थित होते.सुरुवातीला विद्यालयातील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थिनी कुमारी प्राजक्ता जाधव व साजिदा नदाफ यांचे श्री राजेश सामंत व महेश ठाकूर यांच्या हस्ते गौरव करण्यात आले.त्यानंतर सहा.शिक्षक श्री राजेंद्र घाडीगावकर यांनी पालक शिक्षक संघाची रचना कशी असावी याबद्दल माहिती दिली व पालक शिक्षक संघ स्थापन करण्यात आला. श्री.अनंत मधुसूदन सामंत अध्यक्ष ,श्री.राजेंद्र विष्णू घाडीगावकर सचिव ,श्री.शामसुंदर राणे सदस्य , सौ.प्रगती निवतकर सदस्या,श्री.प्रवीण गणपत गावडे सदस्य ,सौ.दीप्ती परब सदस्या व श्री संदीप जाधव असा पालक शिक्षक संघ सन २०२६-२७ साठी स्थापन करण्यात आला.संस्था संचालक श्री महेश ठाकूर यांनी सध्या मोबाईल युगात आपल्या पाल्यांना मोबाईल पासून कसे दूर ठेवावे या विषयी मार्गदर्शन केले. शेवटी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अनंत सामंत .यांनी शाळेमध्ये सुरु असलेले उपक्रम या विषयी माहिती पालकांना दिली. तसेच पालकांना महिन्यातून एकदा विद्यालयाला भेट द्या असे आवाहन केले.

माड्याचीवाडी विद्यालयाचा प्रगतीचा आलेख कायमच प्रगतीकडे – राजेश सामंत
1
/
106
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
1
/
106

Subscribe








