करुळ, कोंडये, हरकुळ खुर्द गावातील शालेय विद्यार्थ्यांना रक्तचंदन रोपांचे वाटप
मा.जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांची उपस्थिती
कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी हरकुळ बुद्रुक मतदार संघातील शालेय विद्यार्थ्यांना रक्तचंदनाच्या रोपांचे वाटप केले व सामाजिक उपक्रमांनी आपल्या शुभेच्छा पालकमंत्री नितेशजी राणे यांना दिल्या. संपूर्ण मतदार संघात 2500 रक्तचंदनाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. सतीश सावंत यांच्या या पर्यावरण संवर्धन संकल्पनेचे जिल्हास्थरातून कौतुक केले जात आहे. यामध्ये नाथ पै ज्ञान प्रबोधिनी, करुळ, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा-करुळ, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोंडये-गावठण, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हरकुळ खुर्द – गावडेवाडी, विद्यामंदिर -हरकुळ खुर्द या प्रशालेत भेट देत शालेय विद्यार्थ्यांना रोपे वाटप करून त्याचे महत्व सांगण्यात आले. यावेळी मा. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मा.जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी शालेय मुलांना मार्गदर्शन केले. शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. आपण आता लावलेले हे रक्तचंदनाचे रोपटे भविष्यात आपला आधार ठरेल, त्यामुळे आपण हे रोपटे लावून त्याचे चांगले संवर्धन करा असा संदेश यावेळी सतिश सावंत यांनी दिला.
यावेळी हरकुळ बुद्रुक मतदार संघांचे जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांनी सतीश सावंत यांच्या या संकल्पनेचे कौतुक केले. व विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडी बाबत मार्गदर्शन केले. आताच्या जीवनात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता, अवेळी लागणार पाऊस अश्या नैसर्गिक आपत्तीला आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रक्तचंदणाचे दिलेले रोपटे आपण लावा व त्याचे चांगले संगोपन करा असा संदेश यावेळी मनोज रावराणे यांनी दिला.
यावेळी मा. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, करूळ येथे सरपंच समृद्धी नर, उपसरपंच पुरुषोत्तम तानवडे, धवन सर,नारकर सर, राजू धवण, सदस्य राजू शिंदे, रिया धवण, चव्हाण मॅडम, प्रमिला कदम, अंनत तानवडे, काका गोमने, संजय सरवणकर, रवींद्र कुडतरकर, जितेंद्र दळवी, कोंडये येथे सरपंच ऋतुराज तेंडुलकर, बाळकृष्ण धोपटे, अण्णा तेंडुलकर, कमलेश तिरोडकर, रिया तिरोडकर, भाऊ ठाकूर, तांबे गुरुजी, दीपक तेली, बबन कर्णिक, हरकुळ खुर्द येथे महेंद्र डिचोलकर, समीर सावंत, प्रकाश दळवी,संजय रावले,मुख्याध्यापक सुनील ठाकूर, आशुतोष रासम, यादव सर आदी शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Subscribe










