तेंडोली येथे श्री देवी अनलादेवी मंदिरात ‘गंगा प्रतिज्ञा’ हे संयुक्त दशावतार नाटक

तेंडोली-भोमवाडी येथील श्री अनलादेवी कला क्रीडा मंडळ यांचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कलाकारांचा समावेश आहे.


कुडाळ : तेंडोली-भोमवाडी येथील श्री अनलादेवी कला क्रीडा मंडळाच्या वतीने तेथीलच श्री देवी अनलादेवी मंदिरात २७ जून रोजी रात्री ७.३० वाजता ‘गंगा प्रतिज्ञा’ हे संयुक्त दशावतार नाटक आयोजित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कलाकारांचा या नाटकात समावेश आहे.
या नाटकातील कलाकार :गणपती-प्रथमेश मेस्त्री,
रिद्धी-सिद्धी-सखाराम परब, राजा निलध्वज-आनंद नार्वेकर,प्रवीर-
साहिल तळकटकर, मदनमंजिरी-यश जळवी,श्रीकृष्ण-आबा कलिंगण,
अग्निदेव-गिरीश राऊळ,ज्वाला-सिद्धेश मुणनकर,अर्जुन-संजय काळे,ऋषकेतू- अक्षय सातार्डेकर, मेघवर्ण-दत्तप्रसाद तवटे, गंगा-गौतम केरकर तर संगीतसाथ:-हार्मोनियम-अमोल मोचेमाडकर,मृदूंगमणी-अर्जुन सावंत,
तालरक्षक- प्रथमेश गावडे यांची आहे.
वावळेश्वर दशावतार मंडळ (तेंडोली) यांचे विशेष सहाय्य राहणार आहे. नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री अनलादेवी कला क्रीडा मंडळ (तेंडोली) यांनी केले आहे.

error: Content is protected !!