स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना पूर्वसूचना देण्यात याव्यात

तसेच ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती करू नये

अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल – अभिषेक गावडे

कुडाळ : स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना पूर्वसूचना देण्यात याव्यात तसेच ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती करू नये अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी दिला आहे.

विद्युत ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून हे स्मार्ट मीटर बसवताना संबंधित ग्राहकाला कोणतीही कल्पना अथवा पूर्वसूचना दिली जात नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवताना संबंधित ग्राहकांना पूर्वकल्पना देण्यात यावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी विद्युत वितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे सुपूर्त केले आहे.

error: Content is protected !!