कळसुली येथे नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन

ग्रामस्थांनी कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा- सरपंच सचिन पारधीये यांचे आवाहन

कणकवली : जून प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या २३ जून २०२६ रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कळसुली ग्रामपंचायत सभागृह येथे १९ जून २०२६ रोजी विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांतर्गत नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून, कळसुली गावातील महिला बचत गटांना हळदीची रोपे वाटप करण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार असून, गावातील दिव्यांग व्यक्तींना छत्र्यांचे वाटपही करण्यात येणार आहे.

सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कळसुली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सचिन पुनाजी पारधीये यांनी केले आहे.

दरम्यान, हे सर्व कार्यक्रम कळसुली भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आले असून, वाढदिवसानिमित्त समाजहिताचे उपक्रम राबविण्याचा उद्देश असल्याचे सरपंच सचिन पारधीये यांनी सांगितले.

error: Content is protected !!