कुडाळ येथील मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटी तर मामा वरेरकर नाट्यगृहासाठी १० कोटी असा एकूण २० कोटींचा निधी मंजूर.
आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कुडाळ नगरपंचायत क्षेत्रातील रंगकर्मी मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटी तर मालवण नगरपरिषदेच्या मामा वरेरकर नाट्यगृहासाठी १० कोटी असा एकूण २० कोटींचा निधी पहिल्या टप्यात मंजूर करण्यात आला आहे.
गेली अनेकवर्षे मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहाचे काम अपूर्णावस्थेत असून निधी उपलब्ध नसल्यामुळे हे काम अपूर्णच होते, नाट्यरसिकांना व्यासपीठ मिळावे यासाठी आमदार निलेश राणे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नगरविकास विभागांतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी पहिल्या टप्यात १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या सोबतच मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह पूर्णपणे नादुरुस्त झाले होते, त्याच्या उभारणीसाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी नाट्यप्रेमींना दिले होते. या नाट्यगृहालाही पहिल्या टप्यात १० कोटींचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर करण्यात आला असून लवकरच दोन्ही कामाचा शुभारंभ होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. लवकरच दोन्ही नाट्यगृह अद्ययावत होऊन नाट्यरसिकांच्या सेवेसाठी खुली होतील.


Subscribe








