सिंधुदुर्ग पोलीस व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली चे आयोजन

मा पंतप्रधान भारत सरकार यांनी फिट इंडिया संकल्पना सुरू केलेली असून त्यानुसार खेलो इंडिया यांचेसूचनेनुसार 3 जुन 2026 जागतिक सायकल दिन असल्याने दिनांक 7 जून 2026 रोजी सकाळी 06:00 ते 08.00 या वेळेत रविवार “Sundays on cycle” रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, तसेच अपर पोलीस अधीक्षक कुमारी नयोमी साटम,यांनी खेळाडू सोबत स्वतः सायकल रॅली मध्ये सहभागी होऊन तरुण पिढीला आरोग्य व स्वास्थ्यबाबत संदेश दिला.

सदरची रॅली कुडाळ पोलीस ठाणे एस.एन. देसाई चौक पानदूर ते पुन्हा पुन्हा कुडाळ पोलीस ठाणे अशी घेण्यात आली. सदर रॅलीकरता मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प. सिंधुदुर्ग श्री रवींद्र खेबूडकर, पोलीस उप अधीक्षक,मुख्यालय श्रीमती श्वेता खाडे,उप विभागीय पोलीस अधिकारी,कणकवली श्री घन:शाम आढाव पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम,श्री अतुल जाधव,अमोल चव्हाण तसेच इतर पोलीस अधिकारी अंमलदार आणि क्रीडा विभागाचे अधिकारी कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

रॅली मध्ये 70 सायकल स्वार उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.रॅली करीता सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले

error: Content is protected !!